प्रभाग ४१ तरवडे वस्ती येथे दादा गुजर केंद्रात दोन गटात तू तू मैं मैं


प्रभाग ४१ तरवडे वस्तीतील दादा गुजर शाळा मतदान केंद्रात बोगस मतदानाचा आरोप; डीसीपी राजकुमार शिंदे, पीआय मानसिंग पाटील यांनी परिस्थिती हाताळली

हडपसर

पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक ४१ मधील तरवडे वस्ती येथे असलेल्या दादा गुजर शाळा मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्याचा आरोप झाल्याने तणाव निर्माण झाला. या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तु-तु मैं-मैं झाली.

परिस्थिती गंभीर होत असल्याची माहिती मिळताच डी.सी.पी. राजकुमार शिंदे आणि पी.आय. मानसिंग पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही गटांना समज देत मतदान केंद्र परिसरात शांतता प्रस्थापित केली.

निवडणूक प्रशासनाकडून बोगस मतदानाच्या आरोपांची चौकशी सुरू असून नियमांनुसार मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मतदान केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला

आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!