
मोठ्या गुन्ह्याची तयारी उधळली! सासवडमध्ये ब्रेझा कारमधून पिस्तूल आणि तलवार जप्त; सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !!
सासवड: सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवार बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.